top of page
Search

मणक्याचे आजार. व योगोपचार

आजच्या जीवनशैलीची नवीन देणगी म्हणून आढळून येणारा आजार म्हणजे मानेच्या कमरेच्या मणक्यांचा आजार. धावपळीचे जग, सतत कामानिमित्त करावा लागणारा प्रवास, दूरदूर शाळा-कॉलेज यामुळे प्रवास. व्यवसायामुळे सतत कॉम्प्युटरवर बैठे काम करणे इत्यादी अनेक कारणांमुळे आपणास हे आजार आढळतात.


👉कारणे

व्यायामाचा अभाव

काम करताना नीट न बसणे

पुढे वाकून बसण्याची सवय

चालताना पाठ सरळ न ठेवणे

सतत मान वर करून टीव्ही बघणे, मोबाईलचा अतिप्रमाणात वापर

अधिक काळ प्रवास करणे, दुचाकी वाहन चालवणे

चुकीच्या पध्दतीने ओझे उचलणे रक्तक्षयामुळे

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी. उदा. नेहमी नेहमी पिझ्झा, वडापाव, चायनीज यासारखे पोषण न करणारे खाद्यपदार्थ खाणे

शरीराला मालीश व सूर्यस्नान करण्याचा अभाव


👉लक्षणे :

मानेच्या व कमरेच्या हाडांमधील रचनेची झीज होते. यामध्ये मुख्यत: करून दोन मणक्यातील असणारी गादीची झीज.

मणक्यात गॅप होणे

मणक्यातील गादी सरकणे

हाड सरकणे, मुंग्या येणे, हात-पाय बधिर वाटणे, चक्कर येणे

पाठदुखी, कंबरदुखी आणि मणक्यांचे आजार,सायटीकेचे आजार केवळ वाढत्या वयातच होतात असे नाही. तरूण आणि अगदी लहान वयातही चुकीची जीवनशैली या आजारांना कारणीभूत ठरू शकते. हे आजार भारतात खूप आढळतात. मानदुखी ही मुख्यत: मानेतील मणक्यांचा आजार आहे. मणके झिजून त्यातली कूर्चा-गादी दबणे,बारीक अस्थि-गुठळया तयार होणे, यामुळे आतील चेतारज्जू आणि बाहेर पडणा-या नसांना घर्षण व इजा होणे या सर्वांचा मिळून हा आजार होतो.


👉कारणे

मणक्यांची झीज होणे हा यातला मुख्य दोष आहे. मणक्यांची झीज जेवढी जास्त,तेवढी लक्षणे जास्त होतात.

👉लक्षणे

मानदुखी, मान जड होणे, मानेत कळा येणे, कवटीच्या तळाशी मानेत दुखणे.

पाठीच्या फ-यांमध्ये दुखणे (कण्याच्या दोन्ही बाजूला फ-याच्या पातळीत दुखणे)

खांद्याच्या भागात दुखणे.

डोकेदुखी - मागे सुरु होऊन डोक्याच्या वर पसरते.

चेतातंतूंवर दबाव आल्याने पुढील लक्षणे दिसतात: पाठीचा चौकोन, खांदा, दंडाचा पुढील भाग, मनगटाचा भाग, अंगठा, इ. ठिकाणी वेदना जाणवते. हे सर्व भाग मानेच्या मणक्यातून निघणा-या चेतातंतूंशी संबंधित आहेत. या भागातले स्नायू पुढे दुबळे होत जातात. चेतातंतू हाडांच्या-गुठळयांनी दाबले-रगडले जाणे हे त्याचे कारण आहे. काही जणांना मान पुढे वाकवल्यावर विजेचा झटका हातापर्यंत चमकतो.

याच भागात मुंग्या येतात. टोचल्याप्रमाणे संवेदना होतात.

कूर्चा चेतारज्जूवर दाबल्यामुळे विशिष्ट लक्षणे दिसतात. हाता-पायात दुबळेपणा जाणवतो, शक्ती कमी होते. लघवी, गुदद्वाराचे नियंत्रण कमी होते. अर्थातच हा आजार आता जास्त झालेला असतो.

मणक्याजवळच्या रक्तवाहिनीवर दाब आल्याने काही लक्षणे दिसतात. यात मुख्यत: चक्कर (मेंदूकडे रक्त कमी पडल्याने) हे लक्षण असते. चक्कर तात्पुरती किंवा सतत येते. चक्कर येण्याचे आणखी एक कारण म्हणजे मानेभोवतीच्या स्नायू व पडद्यांचा सतत ताण हे असते

मणक्यांमध्ये नैसगिकत: चार वेगवेगळे बाक असतात. मानेला पुढच्या दिशेने (सर्व्हायकल स्पाईन), पाठीला मागच्या दिशेने (थोरॅसिक स्पाईन), कंबरेला पुढच्या दिशेने आणि माकडहाडाला मागच्या दिशेने बाकाला लंबर असे म्हणतात. मणक्यांच्या मधून मज्जारज्जू जात आसल्याने व बाजूने मज्जातंतू जात असल्याने मणक्यांना इजा झाल्यास मज्जारज्जूवर,मज्जातंतूवर परिणाम होऊन 'कंबरदुखी/पाठीचे दुखणे/मणक्याचे आजार सुरू होतात

मणक्याच्या आजारांची लक्षणे

अस्थिक्षय किंवा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे पाठीचा मणका कमजोर होणे,

हाता-पायामध्ये मुंग्या येणे, कंप येणे,अवयव बधीर होणे, त्यांच्यात कळा येणे,

कंबरेत दुखणे,सकाळी उठताना त्रास होणे,

कुशीवर वळताना त्रास होणे,किंवा पाठीच्या मणक्यातून कूस बदलताना कड कड आवाज येणे,कूस बदलताना पाठीचा मणका एकदम अवघडल्यासारखं होणे, चालताना त्रास होणे किंवा चालता न येणे, कंबरेच्या मागील बाजूने पायाच्या तळव्यापर्यत्न शीर दुखणे,मांडी घालून खूप वेळ बसू न शकणे,पायाच्या पंजाची ताकद कमी होणे, पायातील स्पर्शज्ञान कमी होणे,

शौचाला बसता न येणे,चक्कर येणे, नसांवरील असह्य़ दबावामुळे लघवीचे नियंत्रण जाणे, असे काही भयप्रद परिणामही प्रसंगी दिसून येऊ शकतात.


मणक्याचे आजार झाल्यास पाळावयाचे पथ्य

वांगे, बटाटा, हरबऱ्याची डाळ, वाटाणे, चवळी, वाल, अतितिखट पदार्थ कटाक्षाने टाळावेत.

अति परिश्रमाची कामे टाळावीत, जड वजनाच्या वस्तू उचलू नये.

जास्त मोटारसायकल प्रवास टाळावा.

मऊ गादीवरझोपू नये.

आंबट पदार्थ, दही, चिंच व आम्ल रसाचे आंबवून केलेले पदार्थ उदा. इडली, ढोकळा, पाव, डोसा बंद करावे.

पथ्य:- थंड, आंबट पदार्थ,छोले,राजमा, मटार व उडदाची डाळ बंद


👉 उपाय :

प्रभावी योग उपचार

गेल्या वीस वर्षांच्या योग साधनेतून योगोपचाराच्या माध्यमातून, वेळोवेळी आनेक शिबीरांचे आयोजन झाले आहे. याचा फायदा बहुसंख्य रुग्णांना झाला आहे.याच अनुभवातून यावेळी

ऑनलाईन

मान,पाठ,कंबर, सायटीका,गुडघे दुखी निवारण योगोपचार शिबीरातचे आयोजन करण्यात येत आहे.

दिनांक ३१ जुलै ते १२ ऑगस्ट २०२३.

वेळ :- सकाळी ८:१५ ते ९:३०, सायंकाळी ७:१५ ते ८:३०

शिबिर शुल्क ₹ ५००/-फक्त

नाव नोंदणी अवश्यक

संपर्क:- ९९६०८००९२०

८१४९५८०९२०

गुगल पे, फोन पे क्रमांक

876 646 1702

टीप :- वरिल संपर्क क्रमांकावर प्रथम नाव नोंदणी करावी आपल्या आजाराची माहीती सांगावी होकार कळविळ्या नंतर पैशे भरावेत

5 views0 comments

Recent Posts

See All

Diseases of the Spine and Yoga Therapy

Cervical spine disease is a new gift of today's lifestyle.Rushing world, constant travel for work, travel due to distant schools and colleges.You get these diseases due to many reasons such as continu

Comments


bottom of page